इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना 18 जुन रोजी सुरु होणार होता. मात्र पावसाच्या विघ्नाने पहिला दिवस एकही चेंडु न टाकता वाया गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर न्युझीलंडच्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरला. पहिल्या इनिंगमध्ये तो फक्त 8 रन करून आऊट झाला. 37 व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅगनरने टाकलेला जलद बाऊन्सरवर पुजाराने पूल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि बॉल हेल्मेटला जाऊन लागला. यानंतर लगेचच मैदानात मेडिकल टीम आली आणि पुजारावर उपचार करण्यात आले. नील वॅगनरने टाकलेला बॉल लागल्यानंतर पुजाराला फार काही करता आलं नाही. 41 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ट्रेन्ट बोल्टने पुजाराला एलबीडब्ल्यू केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे खोतकर केंद्रीय मंत्री दानवेंवर पडले भारी! ‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे
- ‘दोन पक्षांच्या कुबड्यावर धंदा चाललाय आणि दिल्ली जिंकल्याच्या बाता करताहेत’
- महाविकास आघाडी किती दिवस टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिले रोखठोक उत्तर
- ‘ममतांचे कौतुकच, कारण त्यांनी सत्तेसाठी युती मोडत विश्वासघात नाही केला’, भाजपचा शिवसेनेला टोला
- विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले, ‘मी लवकरच घराबाहेर पडणार आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
