🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. तेव्हापासून रहाणे आणि पुजाराचे संघात निवड न झाल्याने चर्चा होत आहे .ते कसोटी संघात पुनरागमन करू शकतील की नाही यावर अनेक जणांनी आपले मत मांडले आहे. यात माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी रहाणे आणि पुजारा संघात परत येऊ शकत नाहीत असे ठाम वक्तव्य केले आहे.
अजय जडेजा म्हणाले “दोघेही एकच फॉरमॅट खेळणारे खेळाडू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांना त्या एका फॉर्मेटमधून बाहेर काढता, तेव्हा मला ते परत येताना दिसत नाहीत. मला आशा आहे की मी चूक असावे. कारण हे दिग्गज आहेत. त्यांनी ८०-९० कसोटी सामने खेळले आहेत. आजूबाजूला पुरेशी प्रतिभा आहे. नवीन पिढीने त्यांना मागे ढकलले आहे. मला वाटत भारतीय क्रिकेटमध्ये अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे निरोप घेण्याची संधी मिळाली नाही. ही नेहमीच एक दुःखद कथा राहिली आहे.”
अजय जडेजा यांच्या आधी आकाश चोप्रानेही अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे संघात पुनरागमन कठीण असल्याचे सांगितले होते. त्याच्या मते २०२३ पर्यंत तरी हे दोघे संघातून बाहेर असतील. रहाणे आणि पुजारा भारतीय कास्ट संघाचे महत्वाचे खेळाडू राहिले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून या दोघांचीही कामगिरी ढासळली आहे. ज्यामुळे आगामी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत त्यांना संघात जागा मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या
- “काही खेळाडू पत्रकारांचे मस्का लावणे एन्जॉय करतात” ; साहा वादांवर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
- “सांस ले और नाम बता दे” पत्रकाराचे नाव सांगण्यासाठी वीरूचा साहाला सल्ला
- “मी पत्रकाराचे नाव सांगणार नाही” ; साहाने ट्विट करत दिले स्पष्टीकरण
- बडे दिल वाला! गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या नवोदित खेळाडूसाठी केएल राहुल सरसावला
- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर


