Share

“मी पत्रकाराचे नाव सांगणार नाही” ; साहाने ट्विट करत दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने श्रीलंकेविरुद्धच्या संघातून वगळल्यानंतर त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला. संघाची घोषणा झाल्यानंतर जेव्हा साहाला श्रीलंकेसाठीच्या कसोटी संघातून वगळण्यात आले, तेव्हा एका “सन्मानित पत्रकाराने” त्याच्याशी मुलाखतीसाठी संपर्क कसा केला आणि संदेश लवकरच धमकीचे कसे झाले हे सांगण्यासाठी साहाने ट्विटरवर चॅटचे फोटो टाकले. ज्यात विशेष म्हणजे पत्रकाराचे नाव उघड केले नाही. आता त्याने ट्विट करत नाव सांगणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

साहाने पुन्हा ट्विट करत सांगितले “मी दुखावलो आणि नाराज झालो होतो. अशा प्रकारची वागणूक सहन करू नये असे मला वाटले आणि अशा प्रकारच्या गुंडगिरीतून कोणीही जाऊ नये असे मला वाटत होते. मी ठरवले की मी चॅट लोकांसमोर उघड करीन, पण त्याचे/तिचे नाव नाही. माझ्या स्वभावात कोणाचेही करिअर धोक्यात आणणे किंवा संपवणे नाहीये. त्याच्या /तिच्या कुटुंबाचे विचार करत मी नाव उघड करत नाहीये. पण असे पून्हा झाले तर मी शांत बसणार नाही. माझे समर्थन केलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो.

साहासोबत झालेल्या घटनेनंतर अनेक चाहते आणि वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री सारख्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयला कारवाईची मागणी केली होती. बीसीसीआईने या प्रकरणी कारवाईचे साहाने प्रकरण न वाढवत नाव सांगण्यास नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!