Share

“काही खेळाडू पत्रकारांचे मस्का लावणे एन्जॉय करतात” ; साहा वादांवर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताच यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला पत्रकारांकडून मिळालेलंय धमकीनंतरचा सगळं वाद संपता संपत नाहीये. साहाने पत्रकाराचे नाव देखील उघड करण्यास नकार दिला आहे. यानंतर क्रिकेट जगतातून वेगवगेळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. वीरेंद्र सेहवागने ट्विट करत साहाला नाव सांगून दे असे सांगितले आहे. मात्र आता भारताच्या माजी खेळाडू असलेल्या वेंकटेश प्रसाद यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवर लिहिले “असे काही पत्रकार आहेत ज्यांचे खेळाप्रती निस्सीम प्रेम आहे. तसेच ते खेळाडूंच्या सीमांचे देखील आदर करतात. मात्र काही असे देखील पत्रकार आहेत जे खेळाडूंच्या जवळील असल्यामुळे अशा गोष्टी करतात. याला ते खेळाडूही तितकेच जिम्मेदार आहेत. पत्रकार या जवळीकचा फायदा उचलतात तर असेही काही खेळाडू आहेत जे पत्रकारांचे मस्का लावणे एन्जॉय करतात.”

बीसीसीआयने या प्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले होते. मात्र धक्कदायक रित्या रिद्धिमान साहाने नाव न सांगण्याची भूमिका स्पष्ट केल आहे. तो म्हणाला कि त्याला कोणाचे करिअर संपवयाचे नाहीये. त्याने त्या पत्रकाराच्या परिवाराचा विचार करत नाव न सांगण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पुढे जर त्याला असा काही अनुभव आला तर तो गप्प बसणार नसल्याचे देखील त्याने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!