Share

बडे दिल वाला! गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या नवोदित खेळाडूसाठी केएल राहुल सरसावला

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू के एल राहुलचे सध्या एका चांगल्या कामासाठी कौतुक केले जात आहे. के एल याने तातडीच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटची (बीएमटी) गरज असलेल्या ११ वर्षीय नवोदित क्रिकेटपटूच्या मदतीला धावून आल आहे. त्याने दुर्मिळ रक्त विकाराच्या उपचारासाठी ३१ लाख रुपयांची मदत केली आहे

वरद नलावडे अशा या नवोदित क्रिकेटपटूंचे नाव आहे. डिसेंबरमध्ये, वरद नलावडेचे वडील सचिन जे एक विमा एजंट आहेत आणि आई स्वप्ना झा यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३५ लाख रुपये उभे करण्याची मोहीम सुरू केली. वरदची माहिती मिळताच राहुलच्या टीमने मोहिमेशी संबंधित संस्थेशी संपर्क साधला.गेल्या सप्टेंबरपासून, पाचवीत शिकणाऱ्या वरदचे ऍप्लास्टिक अॅनिमिया या दुर्मिळ रक्त विकाराचे निदान झाल्यानंतर तो मुंबईच्या जसलोक रुग्णालयात हेमॅटोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होता. वरदच्या रक्तातील प्लेटलेटची पातळी खूपच कमी होती, ज्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणास अत्यंत संवेदनशील बनली. सामान्य तापही बरा व्हायला काही महिने लागत होते. वरदच्या आजारावर बीएमटी (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) हा एकमेव कायमस्वरूपी इलाज होता.

वरदला मदत केल्यानंतर के एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला “जेव्हा मला वरदच्या प्रकृतीबद्दल कळले तेव्हा माझ्या टीमने गिव्ह इंडियाशी (मदत करणारी संस्था) संपर्क साधला जेणेकरून आम्ही त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकू. वरदची शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मला आनंद आहे, आणि तो आता बरा आहे. मला आशा आहे की वरद लवकरात लवकर त्याच्या पायावर उभा राहील आणि त्याची स्वप्ने पूर्ण करेल. मला आशा आहे की माझे योगदान अधिकाधिक लोकांना पुढे येण्यासाठी आणि गरजुंना मदत करण्यासाठी प्रेरित करेल.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!