🕒 1 min read
मुंबई: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने श्रीलंकेविरुद्धच्या संघातून वगळल्यानंतर त्याला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला.संघाची घोषणा झाल्यानंतर जेव्हा साहाला श्रीलंकेसाठीच्या कसोटी संघातून वगळण्यात आले, तेव्हा एका “सन्मानित पत्रकाराने” त्याच्याशी मुलाखतीसाठी संपर्क कसा केला आणि संदेश लवकरच धमकीचे कसे झाले हे सांगण्यासाठी साहाने ट्विटरवर चॅटचे फोटो टाकले. ज्यात विशेष म्हणजे पत्रकाराचे नाव उघड केले नाही. मात्र त्याने नाव उघड करावे यासाठी वीरेंद्र सेहवागने त्याला सल्ला दिला आहे.
वीरेंद्र सेहवागने ट्विट करत लिहले “प्रिय रिद्धी, इतरांना इजा करण्याचा तुझा स्वभाव नाही आणि तू एक चांगला माणूस आहेस. परंतु भविष्यात अशी हानी इतर कोणाला होऊ नये म्हणून, तु त्याचे नाव सांगणे महत्त्वाचे आहे. गहरी सांस ले, और नाम बोल डाल (दीर्घ श्वास घे आणि नाव सांगून टाक),” या ट्विटद्वारे सेहवागने साहाला आवाहन केले आहे.
Dear Wriddhi, it's not your nature to harm others and you are a wonderful guy. But to prevent such harm from happening to anyone else in the future , it's important for you to name him.
Gehri saans le, aur naam bol daal. https://t.co/9ovEUT8Fbm— Virender Sehwag (@virendersehwag) February 22, 2022
रिद्धिमान साहाने ट्विट करत नाव न सांगण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. तो म्हणाला कि त्याला कोणाचे करिअर संपवयाचे नाहीये. त्याने त्या पत्रकाराच्या परिवाराचा विचार करत नाव न सांगण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पुढेहि जर त्याला असा काही अनुभव आला तर तो गप्प बसणार नसल्याचे देखील त्याने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मी पत्रकाराचे नाव सांगणार नाही” ; साहाने ट्विट करत दिले स्पष्टीकरण
- बडे दिल वाला! गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या नवोदित खेळाडूसाठी केएल राहुल सरसावला
- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर
- राजकारणातील दुर्मिळ चित्र! युपीतल्या रणधुमाळीत प्रियंका गांधी आणि भाजप समर्थक एकत्र
- ‘परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला’ – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
