नवी दिल्ली: प्राईम पॉईंट फाऊंडेशनने ११ खासदारांना ‘संसद रत्न अवार्ड २०२२’ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्या आता सातव्यांदा संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांचाही समावेश आहे. हा १२वा संसद रत्न पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे संसदेमध्ये उत्कृष्ट कमगिरी करत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षातही लोकसभेत त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये ४०२ प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या फौंडेशनच्या माध्यमातून २०१० पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
राजकारणातील दुर्मिळ चित्र! युपीतल्या रणधुमाळीत प्रियंका गांधी आणि भाजप समर्थक एकत्र
‘परवा मला एका भिकाऱ्याने नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला’ – नाना पटोले
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सात मार्चनंतर सत्य बाहेर येईल – चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्री घरातल्या घरात गारठले”; अतुल भातखळकर यांची खोचक टीका


