Share

उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७४ कोटी रुपये निधीची तरतूद

Published On: 

उस्मानाबाद : अनेक वर्षापासून रखडत आलेला उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णय काही दिवसापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने मान्य केला. या निर्णयानंतर हा निर्णय उशीरा देण्यावरून बरेच वादंग झाले. पण महाविद्यालयाच्या उभारणीसाठी हव्या असलेल्या शासकिय बाबींची पुर्तता तसेच निर्णय घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या. यातच वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी नव्याने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्य केला. हा प्रस्ताव आता केंद्र शासन व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. या प्रकल्पातील महाविद्यालयासाठी ६७४ कोटी १४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. यामध्ये महाविद्यालयाचे बांधकाम, पदनिर्मीती, यंत्रसामग्री अदी बाबींचा समावेश आहे. या निधीस वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.

हा निधी चालू आर्थीक वर्षापासूनच पुढील चार वर्षाच्या कालावधीत अर्थसंकल्पीय तरतूद करुन घेण्याचे ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागकडील रुग्णालये तसेच किमान २० एकर जागा, स्थावर व जंगम मालमत्ता या वैद्यकीय शिक्षण विभागास नि:शुल्क वापर करण्यास उपलब्ध करुन द्यावा या निर्णयासही या आदेशात मान्यता देण्यात आली आहे. पण या आदेशात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अटीचा कूठेही उल्लेख नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!