मुंबई : आज भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार आदी भाजप नेत्यांसह दादा महाराज मोरे हे देखील उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे कृष्ण असून त्यांनी सुदर्शन चक्र काढावं असं सूचक विधान देखील केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत. त्यांना आता सुदर्शन चक्र काढावंच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातच काढा’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही – देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही असं भाकीत भाजप नेत्यांनी वर्तवलं असून हे सरकार आम्हाला पडण्याची गजर नाही तर ते स्वतःच्या पायात पाय अडकून पडेल असं विधान करणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेविषयी संकेत दिले आहेत. ‘आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- ‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?’
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार


