🕒 1 min read
औरंगाबाद : 1971 साली डिसेंबर महिन्यात भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानी लष्करावर एक निर्णायक आणि ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे एका नव्या देशाची- बांग्लादेशची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या लष्करी शरणागतीची देखील नोंद झाली. 16 डिसेंबरपासून संपूर्ण देशात भारत- पाकिस्तान युद्धाचे सुवर्णजयंती वर्ष ज्याला ‘स्वर्णीम विजय वर्ष’संबोधले जातेय ते साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी यानिमित्त राष्ट्रीय स्मारकावरील अखंड तेवत असलेल्या ज्योतीमधून चार विजय मशाली प्रज्वलित करून त्या देशाच्या विविध भागांत पाठवल्या होत्या. औरंगाबादेत आज त्यातील एका स्वर्णिम विजय मशालीचे आगमन झाले.
अग्निबाज डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनुप जाखड व औरंगाबाद छावणीच्या इतर अधिकाऱ्यांद्वारे या स्वर्णिम विजय मशालीचे भव्य व भावपूर्ण स्वागत आज छावणीत करण्यात आले. यावेळी 1971च्या युद्धातील वीर आणि वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महावीर चक्र विजेते मेजर जनरल अनंत नातू यांच्या निवासस्थानी मशाल नेण्यात आली.
29 जानेवारी 2021 रोजी अहमदनगर येथे मशाल पोहोचणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- ‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?’
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार


