Share

‘मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे’

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिकेत आज हेरिटेज वॉक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी हजेरी लावली होती.

मुंबई महानगरपालिकेची इमारत ही जुनी आहे. राज्यासह देशातील अनेक बदलांची साक्षीदार ही इमारत आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराचा कारभार देखील याच इमारतीतून हाकला जातो. आता या इमारतीच्या वारसाची माहिती व जपणूक केली जाणार आहे. गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. हेरिटेज वॉक या उपक्रमाअंर्तगत पर्यटकांना या इमारतीचा इतिहास पाहता येणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या इमारतीशी निगडित आठवणींना देखील उजाळा दिला आहे. ‘मी 14 वर्षाचा असेन तेव्हा पालिकेत आलो होतो. पालिकेच्या गॅलरीत थांबलो होतो. ही गॅलरी न्याहळत होतो. मुख्यमंत्री होऊन याच सभागृहात महापौरांच्या जागेवर बसेल असं वाटलं नव्हतं,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं. ‘मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात’ असं विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!