🕒 1 min read
वसमत : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. वसमत तालुक्यातील एकूण 119 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. वसमत तालुक्यातील अनेक गावांत पूर्वीचेच आरक्षण कायम राहिले असले तरी काही गावांमध्ये बदल झाला आहे. या सोडतीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण कायम ठेवून इतर आरक्षणांची सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अरविंद बोळगे व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.
वसमत तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी 19 यात अनुसूचित जाती महिला 10, अनुसूचित जमातीसाठी 4, यातही अनुसूचित जमाती महिलांसाठी 2, मागास प्रवर्गासाठी 32 यात मागास प्रवर्ग महिला 16, सर्वसाधारण प्रवर्ग 64 यातही सर्वसाधारण प्रवर्ग महिला 32 अशी सोडत निघाली. सोडतीनंतर बहुमत असूनही विजयी पॅनलकडे आरक्षित सदस्य नसल्याने अनेक पराभूत पॅनल प्रमुखांनी आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
अनुसूचित जाती प्रवर्ग
दाभडी, पार्डी बु. भोरीपगाव, बोराळा, हट्टा, जवळा बु, चिखली, कोणाथा, भोगाव.
अनुसूचित जाती महिलांसाठी
मुडी, ढऊळगाव, पुयनी खु, पळशी, मरलापूर, रांजोना, दोनवाडा, लिंगी, खांबाळा, धानोरा, आरळ.
अनुसूचित जाती प्रवर्ग
कोठारी रायवाडी.
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला
कुरुंदवाडी, सेलू.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
हिवरा खु, सिंगी, रेऊलगाव, राजापूर, मुरुंबा बु., तेलगाव, टेंभुर्णी, खापरखेडा, कुपटी, रोडगा, सावंगी बु., इंजनगाव, कागबन, बळेगाव, माटेगाव, नहाद
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
किन्होळा, कौठा, गणेशपुर, चोंडी त सेंदुरसना, तुळजापूरवाडी, दगडगाव, परळी, मरसुल त सेंदुरसना, मोहगाव, रिधोरा, सुनेगाव, हिरडगाव, सिरळी, करंजी, दारेफळ, महागाव.
खुला प्रवर्ग
अकोली, एकरुखा, कन्हेरगाव, कळंबा, कोर्टा, खांडेगाव, गुंडा, टाकळगाव डिग्रस खु., पळसगाव, माळवटा, पांगरा, धामणगाव, पिंपराळा, पिंपळगाव कुटे, बाभुळगाव, बोरगाव खु, बोरी सावंत, ब्राह्मणगाव बु., भेंडेगाव ,म्हातारगाव, रुंज, आसेगाव, लोण बु, वाई, धामणगाव, वाखारी, वाघी, विरेगाव, सोन्ना, हट्टा, कुरुंदा, आरळ, आंबा, आडगाव, लहान पिंपळा चौरे.
खुला प्रवर्ग महिला
आसेगाव, कानोसा, कुडाळा खुदनापूर, गिरगाव, गुंज, आसेगाव, जवळा, बाभुळगाव, जुनूना, धामणगाव, परजना, पांगरा शिंदे, पारवा, पारडी खुर्द, पुयणी बु, बोरगाव बु, माळवटा, वापटी, सातेफळ, आरळ, सारोळा, सोमठाणा, कौडगाव, दगडपिंप्री, रेणकापूर, पांगरासती, लोळेश्वर, रायवाडी हयातनगर, हापसापूर, सुकळी करंजाळा, महंमदपूरवाडी, थोरावा.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण, आता त्यांनी सुदर्शन चक्र काढावं !’
- ‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?’
- १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने जाणार थेट भंगारात; प्रदूषण रोखण्यासाठी नितीन गडकरींचं महत्वाचं पाऊल
- मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

