Share

‘विधानसभा? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलाय तुम्ही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई महापालिकेत आज हेरिटेज वॉक कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनाला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी हजेरी लावली होती.

अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं. ‘मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात’ असं विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘उद्धव ठाकरे विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री होऊन याच सभागृहात महापौरांच्या जागेवर बसेल असं वाटलं नव्हतं – उद्धव ठाकरे

दरम्यान, या कार्यक्रमाच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या इमारतीशी निगडित आठवणींना देखील उजाळा दिला आहे. ‘मी 14 वर्षाचा असेन तेव्हा पालिकेत आलो होतो. पालिकेच्या गॅलरीत थांबलो होतो. ही गॅलरी न्याहळत होतो. मुख्यमंत्री होऊन याच सभागृहात महापौरांच्या जागेवर बसेल असं वाटलं नव्हतं,’ असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!