औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी ( दि.४ ) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान सिल्लोड शहराचा विकास साधण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिल्लोडच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्ता अनुदान अशा विविध योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषद ही ‘ब’ वर्ग नगर परिषद आहे. सिल्लोड शहराचे दिवसागणिक वाढत जाणारे क्षेत्र व लोकसंख्या वाढीमुळे भविष्यात नगर परिषद ‘अ’ वर्गात रूपांतर होण्याची शक्यता आहे. जवळपास १ लाख लोकसंख्या असणारे सिल्लोड शहर हे औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्याचे केंद्रबिंदू असल्याने येथे खरेदी – विक्रीसाठी नागरिकांची कायम वर्दळ असते.
सिल्लोड शहर हे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासून जवळच असून देश विदेशातील पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी शहरातून जातात. या सर्व बाबी लक्षात घेता शहरात पायाभूत सुविधांसह विविध विकास कामे व सुशोभीकरण कामे हाती घेणे आवश्यक असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. यावर सिल्लोड शहराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ पाच जिल्ह्यांत जवळपास १० हजार घरांची लॉटरी काढणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- अण्णाभाऊ साठे योजनेचा निधी इतरत्र वळवल्याने मंत्री धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागरांचा निषेध
- पंजाबमध्ये जन्मलेल्या आयएएस आंचल गोयल परभणीच्या जिल्हाधिकारी, अनुभवाचा मिळेल फायदा!
- पुरग्रस्तांसाठी कोकण महामंडळाचा पुढाकार, ८२०५ घरांची लॉटरी काढणार
- ग्रामीण भागातील रस्त्यांची बिकट अवस्था; केंद्रीय मंत्री कराड आणि दानवेंकडे निधीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

