औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील नऊ गावांतील अंतर्गत रस्ते व विकासकामांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजुर करावा. तसेच वैजापूर तालुक्यातील तिडी येथे समाजमंदिर, कब्रस्थान संरक्षण भिंत, दलित वस्ती स्मशानभूमी व इतर कामे करण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा प्रभारी नबी पटेल (तिडीकर) यांनी केली आहे. पटेल यांनी या मागणीसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
वैजापूर तालुक्यातील ९ गावांमधील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. गावांमध्ये इतर सोयीसुविधांचीही मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री कराड आणि दानवे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वैजापूर तालुक्यातील खंबाळा, डवाळा, सुराळा, लाडगाव, भग्गाव, तिडी, माळीसागज, एकोडीसागज, टाकळीसागज ही प्रमुख गावे आहेत. परंतु या गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय होत आहे. येथील रस्ते सुधरणे गरजेचे असुन रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजुर करावा अशी मागणी राज्यमंत्री कराड आणि दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे. याशिवाय तिडी गावातील समाजमंदिर, कब्रस्थान, संरक्षक भिंत, दलितवस्ती, स्मशानभूमीचे कामही निधीअभावी रखडल्याचे पटेल यांनी निदर्शनास आणले. या कामासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजुर करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ दलित मुलीच्या अत्याचार प्रकरणी पंतप्रधान मोदी गप्प का?
- स्टेट बँक ऑफ इंडियाने ६०,००० पेक्षा जास्त चालू खाती ‘या’ कारणामुळे केली बंद
- …म्हणून कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचं आंदोलन; मात्र शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनीच घेतलं ताब्यात
- गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही – रावसाहेब दानवे
- खुशखबर! आता औरंगाबादहून फक्त ९१५ रुपयात करा हवाई सफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

