मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे गेल्याकाही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत केल आहे. त्यात अनेक ठिकाणी पूर आला. आणि अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्या दुर्घटना स्थळांना राजकीय पक्ष मदतीचा हात देत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला होता, अनेकांचं सांत्वन केलं होते. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
आता कोकण महामंडळ देखील मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. त्यांनी ८ हजार २०५ घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ९७% घरे अत्यल्प व अल्प गटांसाठी असून गरिबांसाठी घर देण्याचे म्हाडाचे स्वप्न कोकणामध्ये पूर्ण केले जाईल. २३ ऑगस्ट रोजी जाहिरात काढली जाणार असून १४ ऑक्टोबर रोजी सोडत जाहीर केली जाईल तसेच यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के तर अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरे निश्चित करण्यात आली आहेत. सदर घरे ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड, विरारमधील बोळिंज, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ही घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
तसेच, या सोडतीमध्ये अर्जाची किंमत ५६० रु. असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार व उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार असेल. ही संपूर्ण सोडत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

