बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड नगर पालिकेची विशेष सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा झाली. यावेळी नगराध्यक्षांनी बीड शहरातील रस्त्यासाठी २० कोटींचा प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगत केलेल्या कामाची माहिती दिली.
दरम्यान, बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मागासवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये विकासकामे सुरू नाहीत. त्यामुळे या धोरणाचा धिक्कार करत नगरसेवक विकास जोगदंड यांनी सर्वसाधारण सभेत पालकमंत्री धनंजय मुंडे व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा निषेध नोंदवला.
यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर शहरात केलेल्या कामाची माहिती सांगताना म्हणाले, बीड शहराची व्याप्ती वाढत असल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कामांसाठी २० कोटींचे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शहरातील हद्दवाढीत ३० कोटींची कामे, ८८ कोटींचे डी.पी. रस्ते, बनवले. वैशिष्ठ्यपूर्ण तरतुदींमध्ये १० कोटी रुपयांची कामे केली. शहरात अनेक भागात सुसज्ज असे १३ उद्यान बनवले. अमृत अटल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून कामे केली. दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत १५ कोटी, दलितोत्तर भागात ०८ कोटी ची कामे केल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोकणसह पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला गडकरी आले धावून; केली ‘अशी’ मदत
- गडचिरोलीचा ‘प्रोजेक्ट मुंबई’ शी करार, आदिवासी लसीकरण ध्येय साधणार, राजेश टोपेंची माहिती
- ‘जेनेलिया सोबत हा काका कोण?’, रितेशने पत्नी जेनेलियाला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा
- ‘महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहीम’; निलेश राणेंचा आरोप
- …म्हणून कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचं आंदोलन; मात्र शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनीच घेतलं ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

