मुंबई : पुण्याच्या मिळालेल्या प्रतीसाधामुळे नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये येत्या दोन वर्षांत ७ ते १० हजार घरांची निर्मिती व लॉटरी काढली जाणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दिली. तसेच त्यांनी कोकणसाठी देखील ८२०५ घरांची लॉटरी काढणार असेही सांगितले.
तसेच, हे घरे ठाणे जिल्ह्यातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरा रोड, विरारमधील बोळिंज, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ही घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.
पुण्यातील म्हाडाच्या लॉटरीला मिळालेला प्रतिसाद पाहता यापुढे नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद येथे येत्या दोन वर्षांमध्ये कमीत कमी ७ ते १० हजार घरांची निर्मिती करुन त्याचीही लॉटरी काढली जाणार आहे – @Awhadspeaks
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 5, 2021
दरम्यान, सोडतीमध्ये अर्जाची किंमत ५६० रु. असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम ५ हजार, अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार व उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार असेल. ही संपूर्ण सोडत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’


