Share

पंजाबमध्ये जन्मलेल्या आयएएस आंचल गोयल परभणीच्या जिल्हाधिकारी, अनुभवाचा मिळेल फायदा!

Published On: 

परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी पदावरुन झालेले राजकारण आता क्षमले असे म्हणता येईल. राजकीय दबाव झुगारत परभणीकरांनी दाखवलेल्या एकजूटीमुळे अखेर जिल्हाधिकारी पदावर आंचल गोलय रुजू झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांनी विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्या रुपाने मागास असलेल्या परभणी जिल्ह्याला चांगला सक्षम अधिकारी मिळाला आहे.

२०१४ मध्ये आयएएस झाल्यानंतर आंचल गोलय यांना महाराष्ट्र कॅडेर मिळाले होते. त्या नंतर त्यांनी २०१५ – १६ मध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात त्यांचा परिविक्षाधिन कार्यकाळ पूर्ण केला. तसेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नॅचरल गॅस विभागामध्ये त्यांनी सहायक सचिव म्हणूनही काम केले. त्यांना पहिली नियुक्ती नोव्हेंबर २०१६ पासून पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून मिळाली. मे २०१८ पासून त्यांनी रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या. आंचल गोयल यांचा जन्म पंजाब राज्यात झाला आहे. त्यांनी चंदीगड मधून बीई ईलेक्टॉनिक्स पदवी मिळविली आहे. २०१३ मध्ये त्यांची आयकर विभागात निवड झाली होती. आई वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल २०१४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!