Share

अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करा; राजेश टोपेंची केंद्राला विनंती

Published On: 

औरंगाबाद:- कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, देशभर कोरोना संसर्गाचे संकट असल्यामुळे सरकार यावेळी आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. ते औरंगाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असले तरी, सामान्यांना मिळणाऱ्या लसीचा भार कोण उचलणार याचे चित्र अजूनतरी स्पष्ट नाही. केंद्र सरकारने हा खर्च उचलला नाही, तर लसीकरणाचा बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. याच कारणामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी अशी विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!