औरंगाबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी (Assaduddin Owaisi) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गुरुवारी मेरठहून दिल्लीला परततांना गोळ्या चालवत हल्ला केला गेला. या हल्ल्यात ओवेसींना कोणतीही दुखापत झालेली नाही. कारच्या दरवाज्यावर या गोळ्या लागल्या. ओवेसींवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करून हल्ला करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली आहे.
एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गाडीवर एकूण चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये असादुद्दीन ओवेसींना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरुप आहेत. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये दोन हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत.
मात्र या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांना झेड प्लस (झेड प्लस) सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली आहे. मेरठवरुन परत येत असतांना आपल्या गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा खासदार असाऊद्दीन ओवेसींनी केला आहे. त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाल्याची माहितीही असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच या घटनेचे अनेकजण साक्षीदार आहेत, त्यामुळे आता यूपी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सगळ्याच राजकीय पक्षात नाराजीचे वातावरण
“बंडातात्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय…” अशा घोषणा देत राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन
अमृता फडणवीसांनी सांगितला ‘त्या’ ट्विटचा अन्वयार्थ, “म्हणाल्या मागून वार करणाऱ्यांना…”
संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

