मुंबई – लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबिलाची रक्कम 50 टक्के माफ करावी; विजबिल भरले नाही म्हणून कोणाचाही मीटर कट करू नये; तसेच अर्धे वीजबिल माफ करून उर्वरित विजबिल रक्कम भरण्यासाठी मासिक हफत्याने भरण्याची सवलत द्यावी या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता बांद्रा पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यलयावर आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले करणार असल्याची माहिती या आंदोलनाचे संयोजक रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे.वीजबिल 50 टक्के माफ करावे या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष आक्रमक झाला असून उद्या दि. 25 नोव्हेंबर रोजी राज्यभर अनेक जिल्ह्यात विजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
उद्या दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयांवर वीजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ भोसले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’; मनसेचा हल्लाबोल
- योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे
- ‘हिंदुस्थान’ शब्दास एमआयएम आमदाराची हरकत
- “जिन्नांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत हे भारतविरोधी”
- कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे उपाय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

