पटना – बिहारच्या नवनिर्वाचित विधानसभेतील आमदारांचा शपथविधी २३ नोव्हेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या वेळी एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल इमान यांनी शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ शब्दाला आक्षेप घेत ‘भारत’ असा उच्चार केला.
AIMIM MLA refuses to say 'Hindustan' in Bihar Assembly oath, insists on replacing it with 'Bharat'#Bihar #BiharAssembly https://t.co/eBlJRbLr8V
— Jagran English (@JagranEnglish) November 23, 2020
एमआयएमचे अख्तरूल इमान यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारण्यात आले तेव्हा त्यांनी उभे राहून ‘हिंदुस्थान’ शब्दाबद्दल आक्षेप घेतला आणि वादाची ठिणगी पडली.
शपथपत्रात हिंदुस्थानच्या जागी भारत हा शब्द उच्चारावा, अशी विनंती त्यांनी प्रोटेम स्पीकर मांझी यांच्याकडे केली. आपल्याला उर्दू भाषेत शपथ घ्यायची आहे, असे म्हणत त्यांनी हिंदुस्थान शब्दाला हरकत घेतल्याने विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’; मनसेचा हल्लाबोल
- योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


