हैदराबाद – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने दक्षिणेतील राज्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. तेलंगणात सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ तेजस्वी सूर्या यांनी आवेषपूर्ण भाषण करत ओवेसी बंधूंवर टीकेची तोफ डागली. ‘मोहम्मद अली जिनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत देशविरोधी आहे तसंच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांविरोधात ओवेसींना होणारं मतदान आहे’, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.
Youth of Hyderabad turned up in large numbers for rallies in Qutbullapur, Jubilee Hills & Madhpur-Lingampally
Most of BJP candidates for upcoming GHMC polls are youngsters. This has galvanized the support of youngsters to BJP. They'll vote for a new Hyderabad#ChangeHyderabad pic.twitter.com/AQN9PqkNxP
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) November 23, 2020
“ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाही. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’; मनसेचा हल्लाबोल
- योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे
- ‘हिंदुस्थान’ शब्दास एमआयएम आमदाराची हरकत
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


