🕒 1 min read
नागपूर: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५०० चौरस फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीला उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महानगरपालिकेवर दरवर्षी ३४० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंबे राहतात या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, उपराजधानी नागपूर इथेही कर माफीची घोषणा करावी अशा मागणीचे पत्र आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. “ज्या प्रमाणे मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला. त्याच प्रमाणे नागपूर येथील घरांसाठी सुद्धा मालमत्ता करमाफी घोषित करण्यात यावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल”, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे मुंबई व ठाणे येथील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला, त्याचप्रमाणे उपराजधानी नागपूर येथील घरांसाठीसुद्धा मालमत्ता करमाफी घोषित करण्यात यावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल.#propertytax @CMOMaharashtra pic.twitter.com/8LAuPBmEkw
— Dr. Ashish Deshmukh (@AshishRDeshmukh) January 1, 2022
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
- औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
