Share

औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका नवीन वर्षात होणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण औरंगाबाद महानगरपालिके बाबत सर्वोच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल आहे. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत मनपाच्या निवडणुका होणे शक्य नाही. असे असले तरी राज्यातील अन्य १९ महानगरपालिकांसोबत औरंगाबाद मनपाची निवडणूक झाली पाहिजे, असा सूर शहरातील सर्व राजकीय पक्षांकडून होताना दिसून आला.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सदस्यांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. मुदत संपण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारी पूर्ण केली होती. त्यासाठी वॉर्ड रचना, जातनिहाय वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर झाली होती. यास काही माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात तारखा सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने पूर्वीची एक वॉर्ड पद्धत रद्द केली आणि बहुप्रभाग पद्धत लागू करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने औरंगाबाद महानगरपालिकेत बहुप्रभाग पद्धतीनुसार वॉर्ड रचना व प्रभाग तयार केले.

मात्र नुकतेच महाराष्ट्रातील मुंबई आणि औरंगाबाद महापालिका वगळता इतर १८ महापालिकांची निवडणूक मार्च महिन्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. आयोगाने संबंधित महापालिकांना ७ जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार, आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यात औरंगाबाद आणि मुंबई महापालिकांच्या निवडणुकांबाबत निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद मनपा निवडणूक लांबलेली आहे मात्र शहरातील भाजप, काँग्रेस, एमआयएम या पक्षांकडून लवकरात लवकर निवडणूक व्हावी असा सूर निघत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!