🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देर आये दुरुस्त आये’ अशा शब्दात टीका केली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील टीका करत निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय असल्याचे म्हणले आहे.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहिजे. मागील ४ वर्षांपासून जे पैसे तुम्ही घेतले असतील ते मुंबईकरांना परत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याच सोबत ५०० फुटांपर्यंतचा शून्य कर धोरण मध्यमवर्गीयांना सुद्धा लागू करा, असंही शेलार यावेळी म्हणाले.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत
बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत
विदेशी दारुला करात 50% सुट दिलीत
वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली..
आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई"करां"ची आठवण झाली!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 2, 2022
आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर ही टीका केली आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत, विदेशी दारुला करात ५० टक्के सुट दिलीत त्याच सोबत वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली आणि आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!
- ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची बिनविरोध निवड..!
- ‘आशिष शेलारांनी सुपारी उचलली आहे’; किशोरी पेडणेकरांची टीका
- माझा कार्यकाळ अजून संपलेला नाही, या नियुक्त्या आम्हाला मान्य नाही; माजी शहराध्यक्ष थोरात संतापल्या!
- सरकारी वाहनांबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
