मुंबई: सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेट मधले मोठे नाव आहे. तो बॅटिंग करत असताना अनेक गोलंदाजांना घाम सुटायचा. असाच काहीसा खुलासा सचिनच्या काळात नवखा असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेटलीने केला आहे. सचिनला बॉलिंग करणे अवघड जायचे असे तो म्हणाला आहे.
शोएब अख्तरच्या युट्युब वरील शो मध्ये बोलताना ब्रेट ली म्हणाला ” मला सचिनला बॉलिंग करणे अजिबात आवडत नव्हते. कारण तो खूप चांगला खेळात होता. त्याची टेक्निकही भारी होती.” त्या काळात क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकर आणि ब्रेट ली यांच्यात जोरदार स्पर्धा रंगत असायची. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ब्रेट लीने सचिनला १४ वेळा बाद केले आहे.
शोएबला बोलताना ब्रेट लीने भारताबद्दलही कौतुक करताना सांगितले. ” माझ्यासाठी भारत अद्भुत आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. भारतीय उपखंडात खेळणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव राहिलाआहे. मला भारतात बराच वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. कारण तिथे खूप मोठ्या संधी आहेत. मी रावळपिंडीलाही येऊ इच्छितो”
महत्त्वाच्या बातम्या
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
- अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन
- U19WC: भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल सामना
- “शरद पवारांकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव २० हजार धावा..”, राऊतांच्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांचा टोला
- फुसक्या व पोकळ अर्थसंकल्पातून युवकांची घोर निराशा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची टीका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

