Share

‘सुयोग्य नियोजनामुळे मोठी हानी टळली’ ; जयंत पाटील यांनी पुन्हा घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Published On: 

बंगळुरू :  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली व मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले.

दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणावर होवू पाहणारी जीवित व वित्तहानी टळली. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान १ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.

येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस !

यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या १३ ते २० ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली असे जयंत पाटील यांनी सांगितले

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!