मुंबई : राज्याच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता आणखी एका गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने प्रकाशित केले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, भाजप नेत्यांनी ही भेट लपवण्याचा प्रयत्न केला आहे. भेटीची कोणतीही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू दिली नाही किंवा याबाबत इतर कोणत्या नेत्याला कल्पना नव्हती. परंतू खासगी सुत्रांनी या गुप्त भेटीबाबत माहिती दिली. फडणवीस यांच्या कार्यालयातून अशी भेट झाल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. फडणवीस दिल्लीला कधी गेले याची माहिती उपलब्ध नाही. पंरतू ते दुपारी १ च्या सुमारास मुंबईत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आशिष शेलार यांच्या स्वतंत्र भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भेट झाली आहे तर ती का लपवली जात आहे, भेटीची कमालीची गुप्तता का पाळली जात आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. चंद्रकांत पाटील हे चार दिवस दिल्लीत असतील. पक्ष-संघटनेच्या कामानिमित्त ते दिल्लीत असतील असे सांगण्यात आले आहे.
शरद पवारांची मोदी, शाहांसोबत भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात १७ जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तर त्यानंतर शरद पवार यांनी ३ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि नवे सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

