नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सर्व विरोधी पक्ष राज्यसभा सदस्यांना पूर्ण अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आले. या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना सदस्यांनी माफी मागितली तर कारवाई मागे घेतली जाणार असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी माफी का मागू? देशाच्या जनतेसाठी आवाज उठवला म्हणून माफी मागू का? जर सरकारची हीच भूमिका असेल, तर आमचीही काही विचारसरणी आहे, ज्याच्या आधारावर आम्ही काम करत राहू. यासाठी लढा लोकशाही पद्धतीनेच लढावा लागेल. जर तुम्ही कुणाचा आवाज दाबत असाल, तर आम्हीही आमचा आवाज उठवत राहू. राज्यसभा सभापतींना या सगळ्या प्रकाराचा पुनर्विचार करावाच लागेल, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- ‘मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना…’, सदाभाऊंचा बच्चू कडूंना सल्ला
- …म्हणून ममता बॅनर्जी घेणार आहेत शरद पवारांची भेट
- ‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला
- ‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय’, नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला
- ‘हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असं सारखं वाटतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

