Share

‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय’, नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

Published On: 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेऊन सकाळ-सकाळी सरकार स्थापनेची शपथ घेतली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आता पश्चाताप व्यक्त केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

याबाबत नवाब मलिक ट्विट करत म्हणाले, ‘चिड़िया चुग गई खेत अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए!’ असा टोला नवाब मलिकांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी जशास तशे उत्तर देण्याचा उत्तर केला, याचा मला आता पश्चाताप होत आहे. आणि आता असेही वाटते की असे झाले नसते तर चांगले झाले असते. मी आता एक पुस्तक लिहीत आहे, त्यात हा सर्व घटनाक्रम उजागर करणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कोरोना काळात महाराष्ट्राला झालेले नुकसान यावरुन निशाना साधला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे झालेल्या १० हजारांवर मृत्यूंच्या आकड्यांना लपवले आहे. कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले, या कठीण काळात महाविकासअ ाघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!