Share

‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला’

Published On: 

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये भाजपकडून किरीट सोमय्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमरावतीत किरीट सोमय्या हे कोणाचा भांडाफोड करणार याबाबत सध्या उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या हिंसाचाराचा देखील ते आढावा घेणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास सरकारमधील अनेक नेते-मंत्र्यांवर लक्ष केले आहे. त्यांच्यावरील आरोपानंतर अनेकांना ईडीचा सामना करावा लागला आहे. यावेळी माध्यमांशी बोलकताना किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हे काँग्रेस तर हिंसाचार म्हणतेच, पण उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे हे 1992-93च्या दंगलीत रस्त्यावर उतरले होते. आता हिंदू मार खाणार नाही आणि उद्धव ठाकरे त्या मुस्लिमांचे तीन ठिकाणी मोर्चे निघाले दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद उमटले तर हिंसाचारल म्हणता. हा मुस्लिमांचा अत्याचार आहे, उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा ते घोटाळा उघडकीस आणणार आहेत, असा दावा करण्यात येत आहे. तर या संदर्भात दुपारी 12 वाजता किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद होणार असून ते या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!