मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी महिनाभरापासून संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्यांना
पाठिंबा दर्शवला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu kadu) आज एका कार्यक्रमानिमित्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विद्युत विभाग सध्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडणे योग्य नाही. शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज दिली जाते, तर मग वीज बिलात ५० टक्के सवलत का मिळू नये? या मागणीसाठी मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर पुन्हा रुजू व्हावे, असे आवाहन करत त्यांच्या मागण्यांचे समर्थनही मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी, मंत्री यांच्या गाडीवरील चालकाला ४० ते ४५ हजार रुपये पगार मिळतो, तर मग शेकडो कष्टकऱ्यांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या एसटी चालकालाही चांगला पगार मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)यांनी ट्वीट करत बच्चू कडू यांना सल्ला दिला आहे.
४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर बच्चु कडू साहेबांना काय चुक काय बरोबर ते कळले. मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना. एक तर माझ्या ड्रायव्हरचा पगार १२००० करा नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांचा ४०.००० करा, नाहीतर हा घ्या राजीनामा..!! असे ट्वीट करत सदाभाऊ खोत यांनी बच्चू कडू यांना आव्हान दिले आहे.
४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर बच्चु कडू साहेबांना काय चुक काय बरोबर ते कळले..
मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना..
एक तर माझ्या ड्रायव्हरचा पगार १२००० करा नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांचा ४०.००० करा, नाहीतर हा घ्या राजीनामा..!! pic.twitter.com/akdWUSsAuh
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 30, 2021
दरम्यान केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्यामुळे मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीकाही केली. केंद्र सरकारला कृषी धोरण समजत नाही, त्यामुळे देशात कृषी मालाचे दर स्थिर नसतात, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल: एलॉन मस्कने केले कौतुक,म्हणाले..
- शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला- चंद्रकांत पाटील
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

