लातूर: जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला आहे. रुग्णांना प्राणवायु, औषधे आणि खाट उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रुग्णालये आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महामारीवर मात करण्यासाठी एकमेकांशी समन्वयात राहुन काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उदगीर व जळकोट तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थितीचा आढावा व उपाय योजना संदर्भात आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होते.
या आढावा बैठकीत राज्यमंत्री बनसोडे यांनी मुख्यत: ऑक्सीजन, रेमडेसीवीर व कोरोना सेंटर्स बाबत आढावा घेतला. उदगीर व जळकोट तालुक्यातील लॉकडाऊन विषयी माहिती घेऊन यात येणाऱ्या सर्व अडचणीचे निवारण करण्यासंबंधी आवश्यक सूचना केल्या. ते म्हणाले ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर बाबत खाजगी आणि शासकीय रुग्णालयांनी चांगले समन्वय ठेवणे काळाची गरज आहे. तहसीलदारांनी यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त करावा तसेच उदगीर येथे रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा यासाठी एक हेल्पलाईन नंबरही कार्यान्वित करावा जेणे करुन रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होणार नाही. सर्व कोरोना सेंटर्स, हॉस्पीटल्स आणि डेडिकेटेड हॉस्पीटल येथे विद्युत सेवा सुरळीत ठेवावी. फायर ऑडिट करुन घ्यावेत, कोणत्याही कारणास्तव रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश उपस्थित डॉक्टरांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शासकीय आणि खाजगी डॉक्टरांच्या समन्वयाचे महत्व विषद करतांना राज्यमंत्री म्हणाले की कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या आरोग्य व आयुष्याला प्राधान्य देऊन एकमेकांच्या समन्वयात राहण्या बरोबरच सुसंवाद राखणेही आवश्यक आहे. सर्व खाजगी डॉक्टरांनी ऑक्सीजन व रेमडेसिवीर बाबत शासनाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. आवश्यक असेल तेव्हाच रुग्णांना या औषधी व ऑक्सीजन देण्यात यावे. तसेच खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या रिकामे ऑक्सीजन सिलेंडर त्वरित परत करावे आणि वाढती रुग्ण्संख्या लक्षात घेता जंबो सिलेंडर खरेदी करावे असा सल्लाही राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
- परभणीचा ऑक्सिजन टँकर बीडच्या जिल्हा प्रशासनाने पळवला, परभणीकरांवर अन्याय
- हायकोर्ट संतापले! ‘ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फाशी देणार’
- चिंताजनक! सारीतून कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले
- अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन जणांवर कारवाई
- ‘चंद्रकांतदादांचा सल्ला काय ऐकायचा ? या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

