नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाची राजधानी दिल्लीतील आरोग्य व्यवस्था अतिशय गंभीर झाली आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झालाय. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला विनवण्या करून थकल्यानंतर अनेक रुग्णालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीये. या याचिकांवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालय खूपच संतापले. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अडथळा आणणाऱ्यांना अधिकारी आणि संबंधितांची नावे सांगा, त्यांना फासावर लटकवू असा इशारा हायकोर्टाने दिला.
रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक रुग्णालयांना सातत्याने ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटल, जयपूर गोल्डन हॉस्पिटल, बात्रा हॉस्पिटल आणि सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यांच्या याचिकांवर न्या. विपीन संघी आणि रेखा पल्ली यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी विविध रुग्णालयात जाणवत असलेल्या तुटवड्यावरून न्यायमूर्तींनी संताप व्यक्त केला. या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी आहे. ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, शेवटी त्यांचा मृत्यू होईलच. पण, समस्या ही आहे की, ज्यांचे प्राण वाचवणं शक्य आहे ते लोकही मरण पावत आहे. मृत्यूदर कमी करण्याची गरज आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
कोर्ट म्हणाले, ‘आपण याला दुसरी लाट म्हणत आहोत. पण खरंतर ही त्सुनामी आहे. मे मध्यावतीपर्यंत रुग्णसंख्या शिखर गाठणार आहे. केंद्र सरकारने मुलभूत आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी लस आणि ऑक्सिजन यांची काय तयारी आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्राला केली आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्द्यावरून न्यायालयाच्या संतापाचा कडेलोट झाला. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या केंद्र, राज्य वा स्थानिक प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचं नाव दिल्ली सरकारने सांगावं. आपण कोणालाही पाठिशी घालणार नाही. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू, असा सज्जड दम हायकोर्टाने यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

