Share

अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन जणांवर कारवाई

Published On: 

परभणी: अवैधरित्या वाळु उपसा सरास सुरु असताना पूर्णा येथील तहसील कार्यालय, मंडळाधिकारी, तलाठी यांनी वाळू तस्कऱ्याकडे कानाडोळा केल्याने पूर्णा तालुक्यातील १० ते १५ गावांमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध वाळू तस्कारी वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे वाळू तस्कारांचे धाबे दणादणले असुन रेतीची विक्री जोरत चालू आहे याकडे काही दिवसांन पासुन पोलिसांनी दुलर्क्ष केल्याने वाळु तस्करी खुलेआम करत आहे त्यात पोलिसांनी आता याकडे लक्ष दिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईमध्ये अवैध वाळू घेवून जाणारा टिप्पर पोलिसांनी जप्त केला असून दोन जणांना गजाआड करण्यात आले आहे.

वाळूचा उपसा जोरत असताना पूर्णा तालुक्यातील पूर्णा ते माटेगाव रस्त्यावर शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे यांना टिप्परमधून अवैध वाळू विक्रीसाठी घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी पूर्णा ते माटेगाव रस्त्यावर चालक नामदेव बोबडे याला अटक केली असता त्यांच्याकडे कुठला परवाना मिळाला नाही. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच सर्व प्रकार उघडीस आला त्याचा साथीदार बळीराम कुंडलिक बोबडी (रा.माटेगाव) या दोघांना घेऊन घटनास्थळावर पंचनामा करून त्या दोघांना पूर्णा पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान मागील काही दिवसापासून महसूल विभागाचे अवैधरित्या नदीपात्रातून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तालुक्यातील पिंपळगाव, बाळापूर, सुखी, कवडगाव, पूर्णा शहर, निळा, धनगर टाकळी, सारंगी, कंठेश्वर, पेनुर, सातेफळ, धानोरा मोत्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जात आहे. परंतु, याचे सोयरसूतक मात्र कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!