परभणी : शहरासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून बेल्लारी (कर्नाटक) येथून ऑक्सिजन घेवून निघालेला टँकर बीड जिल्हा प्रशासनाने पळवला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य कोविड सेंटरला चाकण ( जि. पूणे) येथून ऑक्सीजनचा पुरवठा होत होता. त्यात राज्य सरकारने बदल केला. चाकण ऐवजी बेल्लारी येथून ऑक्सिजनच्या पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २० केएल ऑक्सिजन दररोज पुरवल्या जाईल, हे अपेक्षीत होते. परंतू शुक्रवारी बेल्लारी येथून निघालेला ऑक्सिजनचा टँकर परभणीला दुपारी पोहचणार असे अपेक्षीत होते.
त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सूचना प्राप्त झाल्या होत्या. निघालेल्या त्या टँकरवर प्रशासनाचे प्रवासाच्या दरम्यान लक्ष होते. परंतू वरिष्ठ पातळीवरील हालचालीमुळे परभणीला निघालेला टँकर बीड जिल्हाकडे वळवला. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार संजय ( बंडू) जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारी पातळीवरील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी रात्री तात्काळ संपर्क साधून बीड जिल्हा प्रशासनाने टँकर पळवल्याबद्दल परभणी जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. हा प्रकार पूर्णतः निषेधार्य व चुकीचा आहे, असे स्पष्ट केले.
- ‘या महामारीच्या काळात आपण सगळे सोबत आहोत’ ; शोएब अख्तरने भारतीयांसाठी मागितली अल्लाहकडे दुवा
- संबंधित रूग्णालयांना रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे लागणार; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
- सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे केंद्राची पाठराखण, काँग्रेसचा आरोप
- ‘तुमच्या अनेक चुका आहेत…’ कंगना रनौतने केजरीवाल यांना सुनावले
- पाच स्पर्धेतील अपयशाचे ओझे घेऊन जगणाऱ्या सचिनचे विश्वचषकाचे स्वप्न २०११ मध्ये झाले पु्र्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

