Share

‘पृथ्वीराज चव्हाण वैफल्यग्रस्त, मोदींवर ओढून-ताणून टीका’, भाजपचा पलटवार

Published On: 

मुंबई : कोरोना लसच नाही तर वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदी यांनी महाराष्ट्रावर अन्याय केल्याची ओरड करणाऱ्यांनी आणि केंद्राने मदत न केल्याचे रडगाणे गाणाऱ्यांची कुवत तेवढीच आहे. चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू व अनुभवी व्यक्तीने ओढून-ताणून अशी टीका करावी, हे वैफल्यग्रस्त म्हणावे लागेल, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी खरी आकडेवारी लपवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक मास्क, पीपीई किट व हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्या मिळाल्या. व्हेंटिलेटर्स मिळण्याच्या बाबतीत आंध्र प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी संसदेतून जे लेखी उत्तर मिळाले, त्यातली खरी आकडेवारी लपवून चुकीचे तर्कवितर्क लावून जनतेची दिशाभूल केली आहे.

पंतप्रधानांनी कधीच कोणत्या प्रकारचा दुजाभाव केला नाही. महाराष्ट्राला एन ९५ मास्क ३२ लाख, पीपीई किट १४.८३ लाख, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्या ९७.२ लाख तर ४,४३४ व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला आहे. राज्यात सत्ता कोणाची आहे, असा संकुचित विचार बाजूला ठेवून, हातचे राखून मदत केली नसून भरभरून मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले होते चव्हाण?
चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार १००० रुग्णांमागे गुजरातला १३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहे तर महाराष्ट्राला केवळ दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेशला एक हजार रुग्णांमागे सात व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असतांना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!