🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी सामन्यात खराब कामगीरी झाल्यामुळे संघाबाहेर झालेला भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीये. ऑस्ट्रेलीया दौऱ्यानंतर पृथ्वी शॉने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज कामगीरी करत ८०० पेक्षा जास्त धावा करत भारतीय संघासाठी दावेदारी सिद्ध केली होती. मात्र तरीही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. आता बीसीसीआयने पृथ्वी शॉला मोठा दणका दिला आहे.
गुरुवारी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचे वार्षिक करार जाहिर केले. या करारातून पृश्वी शॉला डच्चु मिळाला आहे. जाहिर केलेल्या करारातील कोणत्याही यादीत पृथ्वीला स्थान देण्यात आले नाही. यामुळे पृथ्वीला संघात पुनरागमनाची वाट अधिक बिकट झाली आहे. करारात स्थान न मिळाल्यामुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे कधी उघडले जातील.
सध्या पृथ्वी शॉ हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्स संघाकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावत दिल्लीच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. तर दुसऱ्या सामन्यात तो लवकर बाद झाला होता. आयपीएलमधील उर्वरीत सामन्यात चांगली कामगीरी करुन तो निवड समितीचे लक्ष्य वेधुन घेतो का याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर आयपीएल स्पर्धेला विश्वचषकाची पुर्वतयारी म्हणून पाहले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या सभेत स्टेजवर हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे कोरोनाने निधन !
- महागड्या मॉरिसची दमदार खेळी
- भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी बीसीसीआयने केली जाहीर
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘खंडण्या गोळा करायला जशी यंत्रणा कामाला लावली, तशी आरोग्य यंत्रणा कामाला लावली असती तर…’


