Share

महागड्या मॉरिसची दमदार खेळी

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.

राजस्थान संघाची यावेळीही सुरुवात चांगली झाली नाही. तसेच मागील सामन्यातील हिरो कर्णधार संजु सॅमसन लवकर माघारी परतला. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील डेव्हीड मिलरने ४३ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी करत विजय आवाक्यात आणला. तो बाद झाल्यानंतर अष्टपैलु खेळाडू ख्रिस मॉरीसने १८ चेंडुत ३६ धावांची वादळी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजयी केले. या विजयासह राजस्थानने या सत्रातील आपला पहिला विजय मिळवला आहे.

आयपीएल इतिहासात सर्वात महाग ठरलेला खेळाडू मॉरिसने जबरदस्त खेळी करत सामना जिंकून दिला. दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेले १४८ धावांचे आव्हान राजस्थानने १९.४ षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!