Share

भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी बीसीसीआयने केली जाहीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने भारतीय खेळाडुंचा वार्षिक करार जाहीर केला आहे. या करारात वेगवेगळ्या प्रकारचे चार गट असतात. या यादीत अनेक खेळाडूंचे गट बदलण्यात आले असुन त्याला खेळाडुंना एक प्रकारचा इशारा समजला जात आहे.

या करारातील गटानुसार खेळाडुंना मानधन मिळत असते. यामध्ये पहिला गट A+ हा येतो, या गटातील खेळांडुना वर्षाला ७ कोटी रुपयांचे मानधन मिळते. तर दुसऱ्या गट A हा असुन यात खेळाडुंना ५ कोटी रुपये मानधन मिळते. यानंतरच्या B गटातील खेळांडुना ३ कोटी रुपयांचे मानधन मिळते. तर शेवटचा गट असलेल्या C गटातील खेळांडुना १ कोटी रुपयांचे मानधन मिळते. या वर्षीच्या A+ गटात कर्णधार कोहलीसह ३ खेळाडू आहेत. तर A गटात १० खेळांडुचा समावेश आहे. B गटात केवळ ५ खेळाडु आहे. आखेरचा गट असलेल्या C गटात १० खेळाडुंचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या या करारानुसार जर खेळाडूला संधी मिळाली नाही तरी त्याला ही रक्कम मिळू शकते. C गटात संधी देऊनही चांगली कामगिरी झाली नाही, अशा खेळाडूंचा समावेश असतो. काही वेळा C गट हा धोक्याची घंटाही काही खेळाडूंसाठी ठरू शकते. कारण त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना कराराच्या यादीतून वगळण्यात येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!