Share

विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉने रचला इतिहास

Published On: 

दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगीरीमुळे भारतीय संघाबाहेर झालेल्या पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत जोरदार कामगीरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने उत्तरप्रदेशचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयात पृथ्वी शॉने ७३ धावांची खेळी केली होती. याप्रमाणेच संपुर्ण स्पर्धेत नेत्रदीपक कामगीरी करत पृथ्वीने इतिहास रचला आहे. पृथ्वीने केलेली कामगिरी आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला आतापर्यंत करता आलेली नाही.

पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेत ८०० धावांचा आकडा पार केला आहे. या स्पर्धेत एकाही फलंदाजाला आतापर्यंत ८०० धावांपर्यंत पोहोचता आले नव्हते. या स्पर्धेत एकूण आठ सामन्यांमध्ये पृथ्वीने १६५.४०च्या सरासरीने ८२७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत पृथ्वीची २२७ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तसेच या स्पर्धेत पृथ्वीने १३८.२९ स्ट्राइक रेटने धावा करताना चार शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा सलामीवीर पृथ्वी सावने यावेळी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. पृथ्वी बाद झाल्यावर आदित्य तरेने शतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!