Share

‘सचिन वाझे हे प्रामाणिक, ओवेसी सोबत युती म्हणजे हिंदुत्व…हेच राऊतांचं शब्दकोश’

Published On: 

मुंबई : अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत चक्क शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांची युती झाली आणि हे वृत्त राज्यभरात वाऱ्याच्या वेगाने पसरले. दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी युती केल्यामुळे अमरावती मनपाच्या या निवडणुकीची चर्चा राज्यभर रंगत आहे.

तर दुसरीकडं, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत असून त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे.

मात्र, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे हे खूप प्रामाणिक आणि कर्तृत्ववान अधिकारी असल्याचं सांगत त्यांचं समर्थन केलं आहे. सद्याच्या या दोन मुद्द्यांसह याआधीच्या काही घटनांचा संदर्भ घेत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘सचिन वाझे हे प्रामाणिक, ओवेसी सोबत युती म्हणजे हिंदुत्व, केम छो वरळी म्हणजे मराठी बाणा, नाइटलाईफ म्हणजे संस्कृती आणि हरामखोर म्हणजे नॉटी… अर्थात संजय राऊत शब्दकोश,’ असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!