Share

सुनील केंद्रेकरांनी घेतली तातडीची बैठक, खासगी रुग्णालयांना केल्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : मागील एक महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर करत स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त देखील अॅक्शन मोड मध्ये आल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी (१४) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या दवाखान्यातील प्रमुखांची देखील या बैठकीसाठी उपस्थिती होती. आयुक्त केंद्रेकर यांनी कोरोना परिस्थितीचा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. तसेच काही सूचनाही दिल्या आहेत.

या बैठकीमध्ये शहरातील एमजीएम, हेगडेवार, कमलनयन बजाज, सिग्मा आदी रुग्णालयांना उपलब्ध असलेल्या बेड संख्येपेक्षा दीडपटीने वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन बेड देखील वाढवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी रुग्णालयांना दिले आहेत. येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी त्यासाठी प्रशासनाकडे पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात अशा सूचना देखील आयुक्तांनी केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!