Share

राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोलेही आमच्याकडे येऊ शकतात : आठवले

Published On: 

🕒 1 min read

सांगली : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिव वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.व आता NIA सचिन वझे यांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीचं तापलं असल्याचे चित्र दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत असल्याचं सांगताना आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले सुद्धा आमच्या कडे येऊ शकतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पण टिकू शकणार नाही. कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला. त्याचबरोबर ‘गो कोरोना गो’ या प्रसिद्ध घोषणेनंतर त्यांनी आणखी एक नवीन घोषणा दिली आहे. यावेळी त्यांनी ‘गो कोरोना नो कोरोना’ अशी नवीन घोषणा दिली आहे.

सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तसेच कोरोना विषाणूचे रुग्णही वाढत चालले आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आमचं समर्थन आहे. मी स्वतः याबाबतची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!