लातूर : राज्यात तसेच जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसतोय. कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने १५ मार्च ते पुढील आदेश मिळे पर्यंत रात्रीची संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही संचार बंदी लागू असणार आहे. मात्र, यामध्ये जीवनावश्यक सेवा चालु असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ३१ मार्च पर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याच बरोबर धार्मिक सोहळ्यांना तसेच कार्यक्रमांना पाच पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. मास्क नसेल तर कुठल्याही धार्मिक ठिकाणी प्रवेश नाही. पूर्वनियोजित लग्नांना ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच सामाजिक व राजकीय कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे. व्यायाम शाळांमध्ये सुद्धा ५० पेक्षा जास्त लोकांना प्रवेश नाही.
कोरोना प्रतिबंधासाठी हे आदेश असल्याने सर्व नागरिकांनी आदेशाचे पालन करावे. घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असा आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिला आहे. रुग्ण संख्येत होत असलेली वाढ पाहता, जिल्हा प्रशासन या वेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तयारी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे : फडणवीस
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

