🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतांनाच उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मशिदीवरील तब्बल १ लाख भोंगे खाली उतरवले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मविआ सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘कोणताही वाद न होता यूपीमध्ये १ लाख लाउडस्पीकर उतरवले गेले आहेत माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. हाच तो योगी आणि भोगी मधला फरक महाराष्ट्राची जनता चांगलाच ओळखून आहे’, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
कोणताही वाद न होता यूपीमध्ये १ लाख लाउडस्पीकर उतरवले गेले आहेत माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे..
हाच तो योगी आणि भोगी मधला फरक महाराष्ट्राची जनता चांगलाच ओळखून आहे… pic.twitter.com/Z3JLUbY1th— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 5, 2022
दरम्यान, ‘उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत १ लाख लाउडस्पीकर खाली उतरवण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर काढल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाज कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 CSK vs RCB : आता काय सांगावं..! मॅन ऑफ द मॅच मिळूनही हर्षल पटेल नाखूश; म्हणाला, “आतापर्यंत मी…”
- IPL 2022 CSK vs RCB : “मी आता तुझ्यासोबत बॅटिंग करू शकत नाही…”, सर्वांसमोर मॅक्सवेलनं विराटला सुनावलं; पाहा VIDEO!
- “मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो”- रावसाहेब दानवे
- “बाळासाहेबांची कॉपी करणं सोप्पं काम नाही,” ; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
- Breaking News : जिग्नेश मेवाणी आणि रेश्मा पटेल यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास; एक हजार रुपयांचा दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

