Share

“उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत…”, भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा 

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांना ट्वीट करत इशारा दिला. आहे. राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे म्हटले आहे.

“उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेत घुसू देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.”, असे ट्वीट खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केले आहे.

तसेच जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, माझी विनंती आहे तोपर्यंत मुख्यमंत्री योगीजींनी राज ठाकरेंना भेटू नये. राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. असेही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. आता मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया उमटेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!