Share

‘महाविकास आघाडीच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींचे नुकसान’, खा.प्रीतम मुंडेंचा आरोप

Published On: 

बीड : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचे आदेश दिलेत. यामुळे पुढील मनपा निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे. या अनुषंगाने भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळेच ओबीसी समाजाचे नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली.

‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना खा.मुंडे म्हणाल्या की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८ महापालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे हे आरक्षण पुन्हा अंमलात आणणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात आघाडी सरकारने या विषयात दिरंगाई केली आहे.

सोबतच ओबीसींचे आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणपासून वंचित राहणार आहे. या नुकसानीला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आणि आता त्यांच्याच ढिलाईमुळे ते पुन्हा मिळत नाही, असा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!